खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
देवाघरचे ज्ञात कुणाला | देवाघरचे ज्ञात कुणाला |
---|---|
देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम मी निष्कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम कवी : वसंत कानेटकर |
देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम खडा लागतो कुणाचा आणिक चुकतो कुणाचा नेम मी निष्कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक हिमालयाचा मी तो यात्रिक मनात माझ्या का उपजावे मंत्रीपदाचे प्रेम |
No comments:
Post a Comment