खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
पहाटे पहाटे | वारुणीची मिठी |
---|---|
पहाटे पहाटे मला जाग आली तुझी रेशमाची मिठी सैल झाली! मला आठवेना... तुला आठवेना ... कशी रात्र गेली कुणाला कळेना तरीही नभाला पुरेशी न लाली! तुझी रेशमाची मिठी सैल झाली! गडे हे बहाणे, निमित्ते कशाला? असा राहू दे हात माझा उशाला मऊमोकळे केस हे सोड गाली! तुझी रेशमाची मिठी सैल झाली! कसा रामपारी सुटे गार वारा मला दे उशाशी पुन्हा तू उबारा अता राहू दे बोलणे, हालचाली! तुझी रेशमाची मिठी सैल झाली! तुला आण त्या वेचल्या तारकांची तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची लपेटून घे तू मला भोवताली! तुझी रेशमाची मिठी सैल झाली! कवी : सुरेश भट |
पहाटे पहाटे मला झोप आली धुंद वारुणीची मिठी जहरी झाली! मला आठवेना... काSही आठवेना ... कशी रात्र गेली मला आकळेना डोळ्यात लाली, कपाळी लाली, गालीही लाली धुंद वारुणीची मिठी जहरी झाली! वारुणीसेवनाला निमित्ते कशाला? आज कशाला उद्याचे, उद्याला फिरू लागे खोली गमे भोवताली धुंद वारुणीची मिठी जहरी झाली! जाऊन पडलो पलंगाच्या खाली घेतली उशाशी नशेचीच बाटली तदा संपले बोलणे, हालचाली धुंद वारुणीची मिठी जहरी झाली! भरली परडी वेचल्या तारकांची धरुन नरडी जागणाऱ्या फुलांची लपेटून घेतले पलंगाच्या खाली धुंद वारुणीची मिठी जहरी झाली! |
No comments:
Post a Comment