Saturday, June 4, 2011

(२५) मलमली तारुण्य माझे..............मऊमऊ दुलई



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



मलमली तारुण्य माझे मऊमऊ दुलई




मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे

लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे

कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे, पुन्हा तू पेटवावे

रे तुला बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे, तू मला बिलगून जा

कवी : सुरेश भट
चित्रपट : घरकुल (२००७)


मऊमऊ दुलई मी पहाटे पांघरावी
मोकळ्या हवेकरता खिडकी न बंद करावी

लागुनि थंडी परंतु, शिरशिरी मला सतावे
आणखी पांघरूण घेण्या मज लागे उठावे

कापर्‍या माझ्या तनूची ही अवस्था तू पहावे
मी उठेन तेव्हा चहाकरता तू गॅस पेटवावे

करू नये तू आवाज जेणे मज जाग यावी
न तू मज जागे करावे, सूचना ध्यानी धरावी!


No comments:

Post a Comment