खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
चैत पुनवेची रात | सत्यम कंपनीप्रमुख रामलिंग राजूची कृष्णकृत्ये उघडकीला आल्यानंतर तो पोलिसी कैदेत असताना |
---|---|
चैत पुनवेची रात आज आलिया भरात धडधड काळजात माझ्या माईना कदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी पुन्हा भेटु कवातरी साजणा ... मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा. * * * * * * कशा पाई छळता, मागं मागं फिरता असं काय कर्ता, दाजी हिला- भेटा की येत्या बाजारी सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली आता बाराची गाडी निघाली हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा. * * * * * * ऐन्यावानी रुप माझं ऊभी ज्वानीच्या मी ऊंबऱ्यात नादावलं खुळंपीसं कबुतर ह्ये माज्या ऊरात भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची ऊगा घाई कशापायी हाये नजर ऊभ्या गावाची * * * * * * (नारी गं, रानी गं, हाये नजर ऊभ्या गावाची) * * * * * * शेत आलं राखनीला राघु झालं गोळा शिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू राया भान माझं मला ऱ्हाईना ... मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा. * * * * * * कशा पाई छळता, मागं मागं फिरता असं काय कर्ता, दाजी हिला- भेटा की येत्या बाजारी सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली आता बाराची गाडी निघाली हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा. * * * * * * आला पाड झाला भार भरली ऊभारी घाटाघाटात तंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात गार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना * * * * * * (नारी गं, रानी गं, कसं गुपीत राखू कळंना) * * * * * * मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी घडी आताचि ही तुम्ही ऱ्हाऊ द्या ... मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा. * * * * * * कशा पाई छळता, मागं मागं फिरता असं काय कर्ता, दाजी हिला- भेटा की येत्या बाजारी सहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली आता बाराची गाडी निघाली हीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा. कवी : गुरु ठाकूर | चैत अमुशेची रात आज आलिया भरात धडधड काळजात माझ्या माईना कदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना राखली की मर्जी तुमची लाच देऊ पाहुनीया पहा की वो घामाने चिंब ओला मी झालूया राव सोडा आता काही काळ येळ न्हाई बरी पुन्हा घाला कवातरी गजांमागं ... मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले कि बारा. * * * * * * कशा पाई छळता, ह्यांच्या मागं फिरता असं काय कर्ता, रावजी ह्यांनला - भेटा की येका गुपिता जागी घ्या की देऊ केली लाच आता बाराची गाडी निघाली ह्यांनला जाऊ द्या ना घरी, त्यांचे वाजले कि बारा. * * * * * * ऐन्यावानी रुप माझं ऊभा चाळीशीच्या ऊंबऱ्यात नादावलं खुळंपीसं कबुतर पैक्याचं ऊरात पण निहमी भय वाटं कुणीतरी गोवंल मला नि ऊगा घाई कशापायी, असंल नजर कुण्या रावाची * * * * * * (हाय रं, हाय रं, व्हतीच नजर कुण्या रावाची) * * * * * * कंपनी आली व्हती नावा, लोकं झालं हुतं गोळा शिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा आता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू राव भान माझं मला ऱ्हाईना ... मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले कि बारा. * * * * * * कशा पाई छळता, ह्यांच्या मागं फिरता असं काय कर्ता, रावजी ह्यांनला - भेटा की येका गुपिता जागी घ्या की देऊ केली लाच आता बाराची गाडी निघाली ह्यांनला जाऊ द्या ना घरी, त्यांचे वाजले कि बारा. * * * * * * आली धाड, भरली छाती वाजू लागी धाडाधाडा तंग इजार अंग जाळी कोरड फुटं माझ्या व्हटात गार वारा झोंबणारा, नजर माझी जागी ठरंना आडोश्याच्या कंपन्यांचं मी कसं गुपीत राखू कळंना * * * * * * (हाय रं, हाय रं, कसं गुपीत राखू कळंना) * * * * * * मोरावानी डौल माझा वाघावानी तोरा औंदाच्या रं वर्साला मी गाठली हाय चाळीशी जीवा लागलीया घोर तवा दया काढा थोडी घडी मुठीची ही तुम्ही ऱ्हाऊ द्या ... मला जाऊ द्या ना घरी, माझे वाजले कि बारा. * * * * * * कशा पाई छळता, ह्यांच्या मागं फिरता असं काय कर्ता, रावजी ह्यांनला - भेटा की येका गुपिता जागी घ्या की देऊ केली लाच आता बाराची गाडी निघाली ह्यांनला जाऊ द्या ना घरी, त्यांचे वाजले कि बारा. |
No comments:
Post a Comment