खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
माझ्या मातीचे गायन | माझ्या कन्येचे गायन |
---|---|
माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतीनी जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे? माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी जरा पापणी खुलून कधी पाहशील का रे? माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले तुझ्या किनाऱ्यास दिवा कधी लावशील का रे? माझा रांगडा अंधार मेघामेघात साचला तुझ्या उषेच्या कानी कधी टिपशील का रे? कवी : कुसुमाग्रज |
माझ्या कन्येचे गायन तुझ्या उघड्या कानांनी जरा वेळ काढून कधी ऐकशील का रे? तिची काही तैलचित्रे तुझ्या उघड्या डोळ्यांनी जरा न हसता कधी पाहशील का रे? माझ्या कन्येचे गायन मध्यरात्रीला संपेल दीपक राग ती गाता उठून दिवा लावशील का रे? माझा रांगडा कारभार कोपर्याकोपरी साचला व्हॅक्यूम क्लीनर वापरून तू तो टिपशील का रे? |
No comments:
Post a Comment