खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
शोधिसी मानवा | जाण मानवा |
---|---|
शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी मेघ हे दाटती कोठुनी अंबरी? सूर येती कसे, वाजते बासरी? रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी गंध का हासतो पाकळी सारुनी? वाहते निर्झरी प्रेमसंजीवनी भोवताली तुला साद घाली कुणी खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी भेटतो देव का पूजनी अर्चनी? पुण्य का लाभते दानधर्मातुनी? शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी? कवयित्री : वंदना विटणकर | जाण मानवा, त्या तिमजली मंदिरी राह्तो मंत्री एक रे, अपुल्या चंदेरी वायुयान त्याचे बघ उडते अंबरी भाषणे करी तो जणु सरीवरी सरी रोमरोमी फुलवी त्याची रोमांच वैखरी वाहती जणु तुडुंब इंद्रायणी, गोदावरी मंत्री हा हसतो अपुले हात पसरुनी आलिंगन म्हणजे प्रेमसंजीवनी भोवताली त्याच्या सदैव कुणी ना कुणी खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी भेटतो देव का पूजनी अर्चनी? पुण्य का लाभते दानधर्मातुनी? बघ रे भव्यता त्याच्या जीवनी आंधळा खेळ तव थांबवी झडकरी! |
No comments:
Post a Comment