Saturday, June 4, 2011

(२७) सजल नयन नित......................सजल जमिनीवर



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



सजल नयन नित सजल जमिनीवर


सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती

वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यहि सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती

चंद्र चांदणे सरले आता
निरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतिल अमृतधारा
तुझ्याविना वीषधारा होती

थकले पैंजण चरणहि थकले
वृंदावनिचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुनि उखाणे मला घालिती

कवी : शांताराम नांदगावकर

सजल जमिनीवर पाय घसरती
दुर्गंध त्या जळी मिसळले असती

आर्त स्वर मम हवेत विरले
गीत नि काव्य त्यांमध्ये कुठले?
मुक्या माराचे अविरत वेदन
मुरगळले पाय जळजळती

चंद्र चांदणे सरले आता
रडगाणे ही जीवनगाथा
त्या दिवशीच्या पाऊसधारा
साक्षात्‌ विषधारा होती

थकले होते, त्यात पायतण तुटले
अवचित माझे पाय घसरले
पाठीवर कुणी समंध बसले
उगाच खोडा मला घालिती!


No comments:

Post a Comment