Tuesday, June 28, 2011

(१५७) कुणि जाल का, सांगाल का.......................चिरंजीव



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



कुणि जाल का, सांगाल का चिरंजीवांची रात्रीच्या अवेळी
गाण्याची लहर



कुणि जाल का, सांगाल का,
सुचवाल का ह्या कोकिळा
रात्री तरी गाऊं नको
खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची
बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन
देत दारी थांबली

हार पूर्वीचा दिला तो
श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला
काळोख मी कुरवाळला

सांभाळुनी माझ्या जिवाला
मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली
हलकी निजेची पावले

कळवाल का त्या कोकीळा,
की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी
रात्र जागुन काढली

कवी : अनिल


कुणि जाल का, सांगाल का.
“सुचवाल" का ह्या श्यामला
रात्री तरी गाऊं नको
श्रमवू नको अपुला गळा

आधीच दिवसाभराची
भ्रमंती आहे लांबली
कालगती भासतेय
जणू पूर्ण थांबली

दमलाभागला देह
बिछान्यावर झोकुनी दिला
दिवा मालवून खोलीतला
काळोख मी कुरवाळला

पांघरूण ओढुनी मी
शरीरा होते लपेटले
इतक्यात श्यामचे मुक्तकंठ
गान श्रवणी पडले!

कुणि जाल का, सांगाल का.
“सुचवाल" का ह्या श्यामला
म्हणावे रात्री तरी गाऊं नको
फुलवू नको अपुला गळा


No comments:

Post a Comment