खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
कोणास ठाऊक कसा | वेडापिसा ससा |
---|---|
कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा सशाने हलवले कान घेतली सुंदर तान सा, नि, ध, प, म, ग, रे, सा रे, ग, म, प दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा! ससा म्हणाला, चहा हवा कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा सशाने मारली उडी भरभर चढला शिडी विदुषक म्हणाला, छान छान! ससा म्हणाला, काढ पान कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा सशाने म्हटले पाढे बे एके बे, बे दुणे चार बे त्रिक सहा, बे चोक आठ आणि भरभर वाचले धडे गुरुजी म्हणाले, शाबास! ससा म्हणाला, करा पास कवी : राजा मंगळवेढेकर | कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा सशाने हलवले कान आणि अशी घेतली तान - म ग रे, ध रे प सा ध रे प सा दिग्दशर्क म्हणाला, मगर कशाला धरणार पसा? ससा म्हणाला, कारण तिचा धरला घसा कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा सशाने मारली उडी आणि खाली पडली शिडी विदुषक म्हणाला, शिडी पडली की खाली! ससा म्हणाला, शिडी कशी पडणार वरती? कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा सशाने म्हटले पाढे बे एके बे, बेदाणे चार बेकरीत सहा, बेचो काठ आणि पुढे अडले गाडे गुरुजी म्हणाले, साफ चूक ससा म्हणाला, मला लागली आहे भूक! |
No comments:
Post a Comment