Tuesday, June 28, 2011

(१५९) काजल रातीनं ओढून नेला.........................पाणीपुरवठा



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



काजल रातीनं ओढून नेला पाणीपुरवठा



काजल रातीनं ओढून नेला
सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापनी
कधि रे येशिल राजा

पाऊस येडापिसा
जिवाला लावून गेला तात
तुफान आलं सुसाट
माजा करुन गेला घात
कातरवेळी करनी जाली
हरवून गेला राजा

सुकली फुलांची शेज राया
राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळ वाया
श्वासांनी तोडिला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतुनी
ये रे ये एकदा राजा

कवी : सुधीर मोघे
चित्रपट : हा खेळ सावल्यांचा (१९७६)

मुन्शीपाल्टीनं पाणीपुरवठा
कमी क्येला आमचा
जिवा चिंता , भरिल कधी
हंडा माझा पाण्याचा

पाऊस मुसलधार
पडून गेला हुता काल
तुफान आलं सुसाटबी
हुतं त्यासंगं बेताल.
आता यिइल जास्त येळ -
पाणी असा इचार माझा

पाणी नाय काय नाय
हंडा अर्धा रिकामा
मुन्शीपाल्टीचा कारभार
जेरीस आणतो आम्हा.
विनविते परोपरी तुला
ये रे ये खंडुबाराजा


No comments:

Post a Comment