Tuesday, June 28, 2011

(१६०) केव्हा तरी पहाटे........................एका गुन्हेगाराची कैफियत



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



केव्हा तरी पहाटे एका गुन्हेगाराची कैफियत



केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली!

उरले उरात काही आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली!

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली!

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?

कवी : सुरेश भट
चित्रपट : निवडुंग (१९८९)

केव्हा तरी पहाटे सुमारे चारच्या वेळी
मिटले चुकून डोळे , ओलीस पळून गेली

कळले मला न केव्हा लागली डुलकी जराशी
कळले मला न केव्हा निसटून मुलगी गेली

सांगू कसे कुणा मी ते निरवधान माझे
पाहून डोळे मिटले मुलगी पसार झाली

ऐकू न आले काही आवाज निसटण्याचे
गगनी जणू परीने उचलून तिजला नेले

स्फुरल्या लगेच मजला ह्या चार गीतपंक्ती
निसटुन जाय सावज, उरल्या त्या माझ्या संगती

आता कुशीत घेऊन ह्या चार गीतपंक्ती
अश्रुपूर्ण नयने नशीबा मी बोल लावी

अजुनी सुगंध येतो खोलीत मोगऱ्याचा
गजरा केसात होता, मुलगी पसार झाली!


No comments:

Post a Comment