Tuesday, June 28, 2011

(१५६) कंठातच रुतल्या ताना..............मैफल-आयोजकांची काहीतरी गफलत



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



कंठातच रुतल्या ताना मैफल-आयोजकांची
काहीतरी गफलत



कंठातच रुतल्या ताना
कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा, जा, जा, जा,
घेउनि या मोहना

कदंब-फांद्यावरी बांधिला
पुष्पपल्लव-गंधित झोला
कसा झुलावा, परि हा निष्चल
कुंजविहारीविना

थांबे सळसळ जशि वृक्षांची
कुजबुज सरली झणि पक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता
थबके ही यमुना

मुरलीधर तो नसता जवळी
सप्तस्वरांची मैफल कुठली?
रासक्रिडेची स्वप्ने विरली
एका कृष्णाविना

कवी : गंगाधर महांबरे


कंठातच रुतल्या ताना
कुठे असे श्रोतृगण , त्यांना
कुणीतरी जा, जा, जा, जा,
आणा विलंबाविना

मैफलीचा बेत बांधिला
नीट तनपुरा जुळवला
कसा करावा प्रारंभ परी
श्रोतृवृंदाविना

थांबे सळसळ वटवृक्षांची
कुजबुज सरली कोकिलपक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता
थबके कुणी ललना

श्रोतृगण पण नसता जवळी
सप्तस्वरांची मैफल कुठली?
मैफलीची स्वप्ने विरली
एकाही श्रोत्याविना!


No comments:

Post a Comment