Tuesday, June 28, 2011

(१५५) उषःकाल होता होता..............एका मंत्र्याच्या एका पूर्वहस्तकाची कैफियत



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



उषःकाल होता होता एका मंत्र्याच्या एका पूर्वहस्तकाची कैफियत



उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी!
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुशाली!

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली!

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे! “
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे!
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली!

कवी : सुरेश भट
चित्रपट : सिंहासन (१९७९)

उषःकाल होता होता काल रात्र झाली
वारुणीच्या प्याल्यांमध्ये शुद्ध नष्ट झाली

"आम्ही चार घासांचीही आस का धरावी
"जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?”
कृद्ध शब्दांची ऐशा ओठी भरती आली

“तेच डाव करिती फिरुनी हे नवे पुजारी
“तेच डाव उलटविती अम्हावरी ते विखारी
“कोण ऐकत असतो आमुची खुशाली?

“तिजोर्‍यात त्यांच्या असती पैसे कोटी
“असे अम्हा भ्रांत कुठुन मिळेल रोटी
“सांगा अमुची करेल कोण रखवाली

“अशा कशा घेतल्या तीन गाड्या तयांनी
“ असे कसे फिरतात जोडुनी हात दोन्ही
“ अन्‌ का असावी नशिबी आमच्या हमाली?

"उभा देश झाला आता एक बंदीशाला
"आत कैदी अम्ही, करती ते पहारा
“कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

“धुमसतात मनी ऐशा विचारांचे निखारे
“फुलवती त्यांना मधूनमधून वारे"
उषःकाल होता होता काल रात्र झाली


No comments:

Post a Comment