Sunday, June 19, 2011

(१११) घर थकले संन्यासी..............................घरबसल्या



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



घर थकले संन्यासी घरबसल्या



घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते
 
ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते
 
पक्षांची घरटी होती : ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झर्‍यांचे पाणी
 
मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई

कवी : ग्रेस

घरबसल्याच रिकामी, हळू हळू गीत मी रचते
प्रारंभ कसा करावा पण मजला न मुळी सुचते
 
ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
पडदे ओढुन एसी लावुन पाय पसरुन बसले होते
 
एका एका ओळीमागे असतेच आकाशवाणी
एका एका बालदीमागे असतेच टाकीचे पाणी
 
मी चाखत कोकाकोला, छताप्रति उगाच पाही
ये हलके ठिबकून तिथून हे गीत, काय नवलाई!

No comments:

Post a Comment