खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तुम्हांवर केलि मी मर्जि बहाल | मंत्रीपदधार्यासमवेत थोडे हितगुज |
---|---|
तुम्हांवर केलि मी मर्जि बहाल नका सोडुन जाऊ, रंगमहाल पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती ही नजर उधळिते काळजातली पिर्ती जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल तुम्हांवर केलि मी मर्जि बहाल नका सोडुन जाऊ, रंगमहाल हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल तुम्हांवर केलि मी मर्जि बहाल नका सोडुन जाऊ, रंगमहाल लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्या पायी अशीच ऱ्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ तुम्हांवर केलि मी मर्जि बहाल नका सोडुन जाऊ, रंगमहाल कवी: जगदीश खेबूडकर | तुम्हांवर केला मी खर्च चिकार द्या मोबदला आम्हा, राजे थोडाफार कातड्याची झापडं बांधुन डोळ्यांभवती नजर ठेवली मी तुमच्या रूपावरती जवळ येऊन कुजबुज झाली गुपितांची चार तुम्हांवर केला मी खर्च चिकार द्या मोबदला आम्हा, राजे थोडाफार हुरहुर म्हणु की व्यथा म्हणू माझी बसुनी मंचकी सोडता माझी चंची चिंता जाळिते मला, कंत्राट कधी मिळणार? तुम्हांवर केला मी खर्च चिकार द्या मोबदला आम्हा, राजे थोडाफार मोठ्या अदबिनं तुम्हा विनवितो, राजे कंत्राट मला द्या करोड रुपयांचे दिली पाच लाख लाच, स्मरते ना ती दुपार? तुम्हांवर केला मी खर्च चिकार द्या मोबदला आम्हा, राजे थोडाफार |
No comments:
Post a Comment