खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
बुगडि माझी सांडली ग | हपापाचा माल गपापा |
---|---|
बुगडि माझी सांडली ग, जाता सातार्याला चुगली नगा सांगू ग , माझ्या म्हातार्याला माझ्या शेजारी तरुण राहतो टकमक मला तो पाहतो कधि खुणेने जवळ बाहतो कधि नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशार्याला आज अचानक घरी तो आला पैरण फेटा नि पाठीस शेमला किती गोड तो मजसी गमला दिला बसाया पाट मी त्याला, माझ्या शेजाराला घरात नव्हते तेव्हा बाबा माझा मजवर कुठला ताबा याची धिटाई -- तोबा तोबा वितळू लागे ग लोणी बाई, बघता निखार्याला त्याने आणिली अपुली गाडी तयार जुंपुनि खिलार जोडी मीहि ल्याले ग पिवळी साडी वेड्यावाणी जोडीने ग गेलो, आम्ही बाजाराला येण्याआधी बाबा परतून पोचणार मी घरात जाऊन मग पुसतील काना पाहून काय तेव्हा सांगू ग बाई, त्याला बिचार्याला कवी : ग. दि. माडगूळकर |
गठुडं माजं सांडलं रं, जाता सातार्याला दोष द्येतो मी माज्या नशीबाला माझ्या शेजारी शिरिमंत राहतो कामधंदा तो काय बी न करतो कधि खुबीनं सट्टा पन खेलतो कधि न म्या पाहिलं रं बाबा, त्याच्या नजरंला आज सकाली घरी त्यो नवता पैरण फ्येटा नि गल्यात दुपट्टा दिसं ध्यान मला त्यो गोमटा माज्या मनात तवा येक इचार, झटकन आला घरात बायकू त्येची नवती सामसूम सगलीकडं हुती माजी धिटाई -- तोबा तोबा शिरलो म्या खिडकीतुन चोरीमारी करायाला त्यानं नेली हुती अपुली गाडी तयार जुंपुनि खिलार जोडी मी बी पिलो हुतो चिकार ताडी आनलं गठुडं भरून म्या, न्याया सातार्याला बसलो यष्टीत घेऊन गठुडं होतं यष्टीच्या टपावर ठिवलं येता सातारा टपाकडं पाह्यलं न हुतं गठुडं थितं असा रं, जाला घोटाला! |
No comments:
Post a Comment