Sunday, June 19, 2011

(११४) बाभळी...........................एका जीर्णावस्थेतल्या महालाची कहाणी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



बाभळी एका जीर्णावस्थेतल्या
महालाची कहाणी



लवलव हिरवीगार पालवी
काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करिती लोलक पिवळे
फांदी तर काळोखी काळी

झिरमिर झरती शेंगा नाजूक
वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती
रंग नभाचे लोभसवाणे

कुसर कलाकृती अशी बाभळी
तिला न ठावी नागररिती
दूर कुठेतरी बांधावरती
झुकून जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू
लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनीया मन
रमते तेथे सांज सकाळी

येथे येऊन नवेच होऊन
लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखूनी अवघ्या
धुंद सुवासिक पिवळे उटणे

कवयित्री : इंदिरा संत


फुटकी अन थंडगार फरशी
कोळ्यांची छती विणली जाळी
समाधिस्थ एक झुंबर लटके
स्वागतकक्षा काळोखी काळी

टप टप टप टप पाझरती थेंब
छतामधुन, पडता कधि पाऊस
हवेत होता कुबट वास चिरंतन
नव्हती स्थिती अजिबात ती लोभस

काही कलाकृती होती महाली
जिला न ठावी नागररिती
एका बाजूस कठड्यावरती
जीर्ण शतरंजी कुणी टाकली होती

अशाच एका दिवशी ग्रीष्मी
होत्या शेळ्या स्वस्थ पहुडल्या
एक गुराखी बसला होता
महालाबाहेर जरासे दमल्या

आत येऊन बॅटरी घेऊन
डोकावे कुणी प्रवासी चौकस
अंगावर लेवुनी एक डगला
पुटपुटे “काय हा महाल भंकस!”


No comments:

Post a Comment