Sunday, June 19, 2011

(११५) उत्तुंग आमुची उत्तर सीमा.............. ओरॅंगउटॅंगच्या उत्तुंग उड्या



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



उत्तुंग आमुची उत्तर सीमा ओरॅंगउटॅंगच्या उत्तुंग उड्या


उत्तुंग आमुची उत्तर सीमा
इंच इंच लढवूं
अभिमान धरूं, बलिदान करूं,
ध्वज उंच उंच चढवूं!l

परक्यांचा येता हल्ला
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड
होतील इथें ध्वजदंड
छातीची करुनी ढाल,
लाल या संगिनीस भिडवूं

बलवंत उभा हिमवंत
करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रुंची आली,
खिंड खिंड लढवूं

जरि हजार अमुच्या जाती
संकटामधें विरघळती
परचक्र येतसे जेव्हां
चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे,
सागरात बुडवूं

कवी : वसंत बापट

उत्तुंग आमुची उत्तर सीमा
इंच इंच लढवूं
“आम्ही" म्हणजे कोण खरे ते
आम्ही कवी ठरवू

कोणी करो आम्हावर ह्ल्ला
आम्ही म्हणू झणि "अल्ला, अल्ला"
हे अमुचे कृश भुजदंड
होतील पार भितीने थंड
ठोके छातीचे जल्दी पडता,
आम्ही नजर कुणा भिडवूं?

बलवंत उभा हिमवंत
पण त्याला काय अमुची खंत?
तो धवलगिरी, तो नंगा
डोळ्यांतुन अमुच्या वाहे गंगा
जर झुंड गुंड लोकांची आली,
आम्ही कड्याकुलुपे लावू

जरि हजार अमुच्या कविता,
संकटात त्या विरघळती
पडसे येते आम्हा जेव्हा
शुष्क होतसे अमुची जिव्हा
मग वैद्य-डॉक्टर यांवर लक्ष आमुचे,
औषधात बुडवू!


No comments:

Post a Comment