खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
जायचे असेल जरी | ...आणि सात वर्षांनंतरची अखेरची ताकीद! |
---|---|
जायचें असेल जरी न कळतां निघून जा फूल फूल हुंगितां चांदण्यांत गुंगतां देह्भान हरपतां खुशाल मजपुढून जा केशपाश सोडुनी त्यांत वदन झांकुनी रुसुन बैसतें तदा लपत छपत दूर जा गान गायिल्यावरी बीन सारुनी दुरी थकुनि नयन झांकितें त्या क्षणीं उठून जा क्षणिक जायचें असें लागूं दे तुला पिसें विरहिं मीलनीं सुखें मजसि गुंगवून जा आणि जर अखेरचें तुज असेल जायचें जात जात पदतलीं प्राण हे चुरून जा कवयित्री : संजीवनी मराठे |
जायचे असे ठरवुनी झटपट तू निघून जा चूल मूल सर्वथा ह्यांमधे मी गुंतता मनःसौख्य हरवता मीच जाते, मग बघ मजा केशपाश सोडुनी अपेय मी झोकुनी टिव्हीपुढे बैसते तदा करत असते जमा-वजा टिव्हीपुढे बैसल्यावरी ग्लास सारुनी दुरी ग्लानीत नयन झांकिते अपुरी राही जमा-वजा तत्क्षणि जायचे असे लागतसे मज पिसे भरियले स्वप्नसुखे मज गुंगवुन परि तू जा आणि सांगते अखेरचे तू जाशी की मी जायचे ही बाब असे मामुली बर्या बोले पण तू निघून जा |
No comments:
Post a Comment