खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
जपून चाल, पोरि, जपून चाल | आणि मग साठ वर्षांनंतर |
---|---|
जपून चाल, पोरि, जपून चाल बघणार्या माणसाच्या जिवाचे हाल लाडानें वळून बघायची खोड नाजूक नखर्याला नाही या तोड डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल केसांत सुरंगी रंगांत ग विजेची लवलव अंगांत ग खट्याळ पदराला आवर घाल जिंकीत जिंकीत जातेस तूं ज्वानीचं गाणं हें गातेस तूं हांसून होतेस लाजून लाल उरांत लागलेत नाचाया मोर कोणाच्या गळ्याला लागेल दोर? माझ्या या काळजाचा चुकेल ताल कवी : मंगेश पाडगांवकर |
जपून चाल, म्हातारे, जपून चाल तोल जाऊन करू नको जिवाचे हाल वेंधळ्यागत वळून बघायची खोड वेंधळेपणाला तुझ्या नाही या तोड डोळ्यांत घालुन तेल नीट तू चाल हातात काठी धरून चालतेस ग विजेची लवलव नाही अंगांत ग खट्याळ नातीला आवर घाल शिंकत खोकत चालतेस तू वार्धक्याचं गाणं हे गातेस तू उन्हाच्या तिरीपेने होतेस लाल नातीच्या अंगात येउन लागलीय नाचाया मोर तिला आवराया नाही तुझ्या अंगात जोर माझ्या या काळजीने झालोय दिलहवाल |
No comments:
Post a Comment