खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
जिवलगा, येउं कशी रे आंत | काटा रुतला रे पायात |
---|---|
जिवलगा, येउं कशी रे आंत पैंजण रुणझुणती पायांत आप्तजनांच्या नजरा भंवतीं डोळे मिचकुन सदा हांसती थबकतें पाउल रे दारांत करीं कंकणें किणकिण करिती लाजविती जणुं हळु कजबुजती लाजरी, भीति रे हृदयात कवी : ग. दि. माडगूळकर |
जिवलगा, येउ कशी रे आत काटा झणझणतो पायात होते चालत घराभोवती पायी चप्पल घातली नव्हती काटा रुतला रे पायात इथे बसलेय मी फतकल मारुनी झटदिशी ये तू सुई घेउनी नसत्या पडले मी संकटात |
No comments:
Post a Comment