Monday, June 20, 2011

(१२७) सांग तू, माझा होशिल का?...........एक कोटी लाच घेतल्याबद्दलचा आरोपी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



सांग तू, माझा होशिल का? एक कोटी लाच
घेतल्याबद्दलचा आरोपी



सांग तू, माझा होशिल का?
होशिल का?
माझा होशिल का?

वसंतकाली वनी दिनांती
एकच पुशिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशिल का?

नसेल माहीत तुला कधी ते
रोज तुझ्या मी स्वप्नी येते
त्या स्वप्नांच्या आठवणी या
ओठां देशिल का?

दूर तू तरी जवळ तुझ्या मी
नांव गुंतवित तुझिया नामी
मी येता पण सलज्ज जवळी,
जवळी घेशिल का?

कवी: ग. दि. माडगूळकर


सांग तू, माझा होशिल का?
होशिल का?
वकिल तू माझा होशिल का?

प्रभातकाळी तुझ्या हपिसी
एकच पुसतो तुज एकांती
बचाव माझा
हाती घेशिल का?

नक्की न माहीत तुला जरी ते
रोज मम सुटका स्वप्नी येते
त्या स्वप्नाला मूर्त रूप तू
चतुरा, देशिल का?

ह्या क्षणी आहे पुढ्यात तुझ्या मी
ऐकून करामती तुझिया नामी
कठिण जरी का, बचाव माझा
हाती घेशिल का?


No comments:

Post a Comment