खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अर्धीच रात्र वेडी | संपूर्ण |
---|---|
अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी येता भरून आले जाता सरून गेले नाही हिशेब केले येतील शाप कानी आता न सांध्य तारा करणार रे पहारा फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी शापू तरी कशाला या बेगडी जगाला मी कागदी फुलांनी भरतेच फूलदाणी कवी : विंदा करंदीकर | संपूर्ण तू ग वेडी, शिवाय तू अडाणी सांगतो तुला मी ती एक कटु कहाणी दुर्लक्षिले तुला जर, ना तो गुन्हा जगाचा का खेळतील कोणी तुजसंगे छ्प्पापाणी “येता भरून आले जाता सरून गेले” संकेतपूर्ण बोली ऐशी तुझी दिवाणी वेडावरी तुझिया करणार खास उतारा मांत्रिक आणिला जो, पाहून आणीबाणी देऊन शाप काही, मांत्रिक तो समंधा करणार पार त्याची झणि दाणादाणी |
No comments:
Post a Comment