Monday, June 20, 2011

(१२९) अनाम वीरास..........................मंत्रीपदधारी वीरास



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अनाम वीरास मंत्रीपदधारी वीरास



अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्‍त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी!

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा!

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव!

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान!

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा!


कवी: कुसुमाग्रज


प्रणाम बाबा, अजुन न झाला तुझा जीवनान्‍त
स्तंभ बांधले परि तुझिया नावे जने अगणित!

छुमछुमत्या पैश्यांच्या थैल्या जमविशी तुजपाशी
आणखी पैसे जमवायाला उत्साहे सरशी!

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
डाराडुर तू झोपा करिशी, नसे भयभाषा!

जनभक्तीचे तुझ्यावरी की उधाणले भाव
रियासतीवर असे नोंदले कुणी तुझे नाव!

बहुत गाती भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे, त्यांना लाचदान!

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा बाबा तुजला पराक्रमी वीरा!



No comments:

Post a Comment