खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अर्थशून्य भासे | अर्थशून्य भासे |
---|---|
अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा धर्म न्याय नीति सारा खेळ कल्पनेचा ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे ! सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा कवी : वसंत कानेटकर नाटक: मत्स्यगंधा (१९६४) |
अर्थशून्य भासे मज हा कलह बाई तूझा मुद्दा तरी तुझा काय हा खेळ कल्पनेचा हट्ट एक हृदयी धरुनी तू फुगुनी बसावे वीज पडावी तैसे तू अवचित कडाकडावे सर्वनाश एकच दिसतो नियम बाई तूझा दैव ज्यास लोभे त्याला लाभ शांततेचा दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा |
No comments:
Post a Comment