खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
अजून नाही | अजून नाही |
---|---|
अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ; अशा अवेळी पैलतिरावर आज घुमे का पावा मंजुळ. मावळतीवर चंद्र केशरी; पहाटवारा भवती भणभण; अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती तिथेच टाकुन अपुले तनमन. विश्वच अवघे ओठा लावुन कुब्जा प्याली तो मुरलीरव; डोळ्यामधले थेंब सुखाचे: "हे माझ्यास्तव... हे माझ्यास्तव..." कवयित्री : इंदिरा संत |
अजून नाही उठला नवरा केव्हाच उठले सगळे गोकुळ; अशा अवेळी शेजारघरती गर्जू लागला श्री. भांदकुदळ. पूर्वदिशेवर सूर्यकेसरी ऊन ओके त्याचे रणरण; अपुल्या किचनमधे उभी ती निःश्वास टाकत, सुन्न तिचे मन. विश्वच अवघे अपुल्यात दंग कॉफी प्याली ती चवहीन; डोळयांमधुनी थेंब गळाले; "हे कोणास्तव.... हे कोणास्तव...." |
No comments:
Post a Comment