Monday, June 20, 2011

(१३२) अनुराग.................................आणि राग



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



अनुराग आणि राग



अनुरागाचे थेंब झेलती
प्रीत-लतेची पाने
तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी
फुलती धुंद तराणे

मंतरला हा कुंज लाजरा
महिवरला सुम-भार हासरा
झिरमिर झिरमिर पाऊसधारा
गाती श्रावण-गाणे

मधुमय हा मृद्‍गंध वाहतो
बहरुनिया वनवृंद नाचतो
तरु वेलींना असे बिलगती
अधि-या प्रीत-सुखाने

कवी : शांताराम नांदगावकर


तव रागाच्या उडता ठिणग्या
रचतो हे गाणे
तुझ्या नि माझ्या तंट्यामधुनी
फुलती तंग तराणे

मंतरला हा मंच खाजरा
महिवरला कोणी तू असुरा?
कुरबुर कुरबुर अविरत चाले
एकच रडगाणे

तुडुंब निर्झर गढुळ वाहतो
बहकून समंधवृंद नाचतो
वेली तरूंना घट्ट बिलगती
भेदरून भयाने


No comments:

Post a Comment