खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
रात्रीस खेळ चाले | रविवारचा दिवस |
---|---|
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा आभास सावली हा, असतो खरा प्रकाश जे सत्य भासती ते, असती नितांत भास हसतात सावलीला, हा दोष आंधळयांचा या साजीर्या क्षणाला, का आसवे दिठीत मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत गवसेल सूर अपुल्या, या धुंद जीवनाचा कवी : सुधीर मोघे चित्रपट : हा खेळ सावल्यांचा [१९७६] | सक्काळी उठून चाले, ह्या रिकामटेकड्यांचा, संपेल ना कधीही खेळ "ब्रिज"चा वा "रमी"चा तो चंद्र होई गुप्त, रवी तेज तळपू लागे; चहाकॉफी रतीब हा मी अभिशाप भोगे तो सूर्य आहे साक्षी, जे सांगते मी त्याचा डोक्यात चौकडीच्या न कधी पडे प्रकाश : कर्तव्ये असतात काही ज्यांकडे लागतेच लक्ष हसतात खिदळतात, हा दोष आंधळयांचा या विटल्या क्षणाला, विचार येई मनात जावे पळून दूर कुठेतरी काननात; गवसेल सूर मजला, निवांत जीवनाचा |
No comments:
Post a Comment