Monday, June 20, 2011

(१२२) तिचा रुमाल.........एका चपलेची आणि एका पूर्व"कांते"च्या स्मृतीची गोष्ट



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



तिचा रुमाल एका चपलेची आणि
एका पूर्व"कांते"च्या स्मृतीची गोष्ट



जो दरवळायचा कधी तिच्या गंधानी
तो भिजत राहतो आता माझ्या आसवांनी
तिचा तो धुंद, मंद गंधही नाही
तिचा तो हळुवार स्पर्शही नाही
तिचा तो मधात भिजवलेला आवाजही नाही
हुरहुर लावणारी, काळीज चिरणारी
तिची ती नजरही नाही
फक्त तिच्या आठवणींचे धागे जपत,
माझ्यासारखा आरवार होतो,
माझ्या आसवांत भिजत राहतो;
तिचा रुमाल…….


ती तोडून जाईल सगळे धागे
तिचा गंधही उरणार नाही मागे
तिला कळणार नाही माझी वेदना
ती ऎकणारही नाही माझे रडणे
ती विसरुन जाईल शपथा वचने
विसरुन माझ्या स्पर्शाची थरथर
ती होईल त्याच्या स्पर्शासाठी आतुर
माझ्यासारखा आरवार होईल,
माझ्या आसवांत भिजत राहिल;
तिचा रुमाल…….

कवी : मनीष हातवळणे



जी दरवळायची कधी तिचा विचित्रसा मंद गंध
ती राही अता कुठे ढिगात कचर्‍याच्या जायबंद
तिचा तो कुंद, मंद गंधही नाही
तिचा तो कडकपणाही नाही
तिचा तो फटकफटक आवाजही नाही
सूर लावणारी, संथ गतीची
तिची ती करकरही नाही
माझ्या पूर्व"कांते"च्या अतर्क्य लहरी जपत
मी चक्रावून पार गेलो होतो.
आता कचर्‍याच्या ढिगात असे कुठेतरी
माझी जुनी चप्पल...
आणि माझ्या पूर्व"कांते"ची स्मृती!

ती जगदंबा तोडून जाता सगळे धागे
तिच्या स्मृतीचा गंध न उरला मागे
कोणा कळणार का माझा प्रमोद?
कोणी ऐकणार का माझा कामोद?
मी विसरून गेलो स्वप्नाळू शपथा वचने
विसरून गेलो स्वप्नाळू थरथर;
आहे मनःस्वास्थ्यासाठी माझ्या मी आतुर.
माझ्यासारखा भाग्यवान मीच.
आता कचर्‍याच्या ढिगात असे कुठेतरी
माझी जुनी चप्पल...
आणि माझ्या पूर्व"कांते"ची स्मृती!


No comments:

Post a Comment