खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
आज हृदय मम विशाल झाले | कवीची बायको |
---|---|
आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुनी गगन लाजले आज माझिया किरणकरांनी ओंजळीमधे धरली अवनी अरुणाचे मी गंध लाविले या विश्वाच्या कणाकणांतुन भरुन राहिले अवघे जीवन फुलता फुलता बीज हरपले कवी : शंकर वैद्य |
आज हृदय मम उदास झाले तव कवन पाहुनी गगन लाजले आज तुझ्या निश्चयी करांनी घेउन कागद धरली झरणी 'ट'ला 'ट'चे तू गंध लाविले या शब्दांच्या कणाकणांतुन उभे तुझे हे राहिले कवन ते फुलता फुलता अर्थ हरपले |
No comments:
Post a Comment