खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
गाणार्या पक्ष्यास | वारुणीवल्लभाला सल्ला |
---|---|
समय रात्रीचा कोण हा भयाण बळे गर्जे हे त्यांत घोर रान अशा समयी छबुकड्या पाखरा तू गात असशी; बा काय तुझा हेतू? गिरी वरती उंच उंच हा गेला तमे केले विक्राळ किती याला दरी गर्जे, फूत्कार पहा येती, किती झंझानिल घोर वाहताती दीर्घ करिती हे घूक शब्द काही क्रूर नादे त्या रान भरुनी जाई अशा समयी हे तुझे गोड गाणे रम्य पक्ष्या, होईल दीनवाणे तुझ्या गानाचे मोल नसे येथे कुणी नाही संतुष्ट ऐकण्याते जगे अपुल्या कानास दिली टाळी वृथा मानवी हाव अशा वेळी तुझे गाणे हे शांत करी आता पहा, गर्जे वन घोर हे सभोंता किर्र करिती हे तीक्ष्ण शब्द कीट असे त्यांचा या समयी थाटमाट पुढे येईल उदयास अंशुमाली दिशा हसतील वन धरिल रम्य लाली हरिणबाळे फिरतील सभोवार तदा येवो गाण्यास तुझ्या पूर तुझे भ्राते दिसतील एक ठायी हरित कुंजी ज्या हास्य पूर्ण काही वदुनि त्यांच्या सह रम्य गीत बा रे मधुर नादे वन भरुनि टाक सारे कवी : बालकवी |
समय रात्रीचा येई संपता दिवसवेळ नसे नवीन काही त्यात, जातसे काळ अशा समयी बसुनी कोचावरी तू "पीत" बसशी; बा काय तुझा हेतू? नभी वरती उंच उंच तू जाशी चढुनी वारुणीचा असर येत बेहोषी कधी गर्जशी, फूत्कार मधुन करशी झंझट वारुणीपान करी ऐशी कधी उच्चरिता तू स्खलित शब्द काही मंडुकनादे जणु खोली भरुनी जाई अशा समयी तुझे असे चालू खाणे शेवचिवड्याचे भरूनिया बकाणे तुझ्या बोलांचे मोल नसे येथे कुणी नाही उत्सुक ऐकण्याते जन ठेवती कानांवर अपुल्या हात वृथा हावभाव तव अशा वेळी होत ऐक, "थांबव वारुणीपान पूर्ण आता " सांगे निक्षुनी एक यक्षगण सभोंता किर्र करिती जरी तीक्ष्ण शब्द त्यांचे जाण असती ते शब्द बहुसूज्ञतेचे पुढे येईल उदयास अंशुमाली दिशा हसतील अन् धरतील रम्य लाली देवदूतही फिरतील सभोवार - जर बदलशील चिरकाल अपुला नूर तुझे परततील सगेसोयरे खास आणि तुझी करतील विचारपूस करुनि त्यांच्या सह बातचीते करी कालक्रमणा तव उल्हसित चित्ते |
No comments:
Post a Comment