खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
पावसाच्या धारा | ग्रीष्म ऋतू |
---|---|
पावसाच्या धारा येती झरझरा झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा रस्त्याने ओहोळ जाती खळखळ जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ झळके सतेज ढगावर वीज नर्तकीच आली गमे लेवुनिया साज झोंबे अंगा वारे, काया थरथरे घरट्यांत घुसूनिया बसली पाखरे हर्षलासे फार नाचे वनीं मोर पानांतून हळूं पाहे डोकावून खार झाडांचिया तळी डोईवरी मारा रानातील गुरे शोधिती निवारा नदीलाही पूर लोटला अपार फोफावत धावे जणू नागीणच थोर झाडांची पालवी चित्ताला मोहवी पानोपानी खुलतसें रंगदार छबी थांबला उजळे आकाश सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश किरण कोवळे भूमीवरी आले सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले सुस्नात जाहली धरणी हासली, वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली कवयित्री : शांता शेळके |
घामाच्या निथळती टपटप धारा झाकळले नभ, न यत्किंचित वाहे वारा रस्त्यांवर धावती वाहने भराभरा जागोजागीं खड्ड्या-खळग्यांचा पसारा ढीग पदपथांवर रेतीचे, खडीचे गमती ते हिमालय-सह्याद्रींचे बच्चे तापवे अंगा उष्मा ग्रीष्माचा, हरे हरे घरट्यांत चुपचाप बसती पाखरे काय करती न कविस ठावे लांडोर-मोर न गेला कवी कधी वनीं रम्य किंवा घोर चंडांशूच्या तीरांचा डोईवरी मारा गुरे शोधिती सावल्यांचा निवारा नसे पाणी नदीत एक गुढघाभर पाणी नळातून ठिबके न थेंबभर झाडांची सावली होई क्षणभर सुखकरी ललना कोणी चतुर वापरे रंगी छतरी थांबले नभी यान अचानक भानूचे निखळूनी चाक एक एका बाजूचे घरंगळूनी ते चाक भूमीवरी आले सेवक भानूचे ते धरण्या धावले दृश्य हे पाहून धरणी हसली, रेखिले वर चित्र कवीने असली! |
No comments:
Post a Comment