खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
उजाडल्यावरी सख्या | गुत्तेदार आणि गिर्हाईक |
---|---|
उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू? पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू? पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे अजून थांब लागली जगास झोप आंधळी दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी तुला मला विचारुनी फुटेल आज तांबडे उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे कवी : सुरेश भट |
उठ, अता, गिर्हाईका, निघून जा घराकडे बाहेर पाही पौर्णिमेचे टिपूर चांदणे पडे उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू? पुन्हा पुन्हा अंमलात बरळतोस काय तू? "आणि हवी, आणि हवी" मागणी तव कुणाकडे? उठ, अता, गिर्हाईका, निघून जा घराकडे अजून बाटलीत त्या तुझा रे जीव गुंतला अजून गिलासातला तव सोमरस न संपला अजून असे कसे तुझे सांग नरडे कोरडे उठ, अता, गिर्हाईका, निघून जा घराकडे अरे, लागली असे जगास झोप गाढशी फिरतसे नभात चंद्र श्वान जणु बेवारशी "कुठे जावे?" असता संभ्रमी तो आरवेल कोंबडे उठ, अता, गिर्हाईका, निघून जा घराकडे |
No comments:
Post a Comment