Sunday, June 19, 2011

(९९) मग माझा जीव तुझ्या.......................आणीबाणी आणि डॉक्टर



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



मग माझा जीव तुझ्या आणीबाणी आणि डॉक्टर



दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्‍यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

कवी : सुरेश भट


मुंबई -पुणे हायवेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय ब्रेकवरी, हृदय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक माझी तुज भेटली
आणि मम आणीबाणी मम डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या हाती वणवणला
धावा माझा तुझ्या अंतरात नाही जरी हुरहुरला

मी फिरलो दूर दूर माझ्या विभ्रमात चूर
पाउल माझे अडखळूनी फुलला भासे उंबर!

विसरलो सर्व सर्व आपुले मी पूर्वपर्व
पण नाव तुझे उभे राहिले माझ्या ओठांवर

सहज तू लावशी तव स्टेथॉ मम छातीवर
ऐकुनी धडधड वदशी मज "दैव तुझे बलवत्तर!

"जेव्हा तू उठशील दर्पणात पाहशील
अस्तित्व तुझे खास मनी आनंद दरवळेल

"जेव्हा रात्री इंजेक्शन माझे कुशीत तू घेशील
तारुण्य तुझे तुझ्या गात्रातून गुणगुणेल

"मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
नि टपालटोपलीत तव बिल माझे येउनी ठपेल!"


No comments:

Post a Comment