Monday, June 27, 2011

(१५२) बगळा................................बगळा, कावळा, मासा, कोल्हा, माणूस



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



बगळा बगळा



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे


निळ्या आकाशात
उडणारा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
तळ्याच्या काठावर
मनोहरपणे झेपावला.
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो


बगळा आणि कावळा



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे


निळ्या तळ्याच्या
काठावरचा कावळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
पांढर्‍या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या कावळ्याला
’हुडुत्‌’ म्हणालो होतो



बगळा आणि बगळी



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे


निळ्या तळ्याच्या
काठावर बगळा
बघत वाट बगळीची
उभा राहिला तिष्ठत;
बगळी गेली होती
शॉपिंग्‌ करायला.
चार तासांनी परतल्यावर
'हुश्श' म्हणाली


बगळा आणि मासा



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे


निळ्या तळ्याच्या
काठावरच्या बगळ्याने
तळ्यातल्या एका माश्याला
गिळंकृत करायला
पाण्यात सूर मारला.
चोचीत पकडल्यावर
बगळा त्याच्या देवाला
'थॅंक्यू' म्हणाला


बगळा आणि मासे



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे


निळ्या तळ्याच्या
काठावर माझा बंगला.
गळ्यात भोळ्या लोकांच्या
मी माल बांधला;
पैसा करायला,
बंगल्यात छान रहायला.
मी माझ्या देवाला, दैवाला
'थॅंक्यू' म्हणतो


बगळा मुलांची शाळा



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावर एकदा
जमली मुलांची शाळा
रमली मुले खेळात
“तळ्यात, मळ्यात”.
चित्र हे
अधिक कोण
खुलवू शकेल?

बगळा "आम्हाला वगळा, नि पहा...”



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
म्हणाला एकदा माणसाला,
"आम्हाला वगळा,
नि पहा होतेय्‌ का
अपुरे चित्र तुमचे पुरे.”
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो


बगळा आणि तपस्वी



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे

निळ्या नदीच्या
काठावर एकदा
एका तपस्व्यागत
एक बगळा
स्तब्ध उभा होता.
नदीच्या प्रवाहागत
कालप्रवाह संथपणे
चालला होता


बगळा आणि पुन्हा कावळा



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे





निळ्या तळ्याच्या
काठावर बगळा
होता एकदा बसला;
तिथे आला कावळा,
त्याचा नि आपला रंग पाहून
लज्जाविष्ट झाला.
दुकानात एका जाऊन
साबण विकत आणून
बसला घासत आपलं अंग
राहिला घास-घास-घासण्यात दंग
बगळा गेला होता
केव्हाच उडून!

बगळा आणि नीती



निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
एका अपुऱ्या चित्राला
मदत करायला
काळ्या ढगाच्या
दिशेने उडाला...
मी त्या बगळ्याला
'थॅंक्यू' म्हणालो

कवी : पु.ल.देशपांडे







निळ्या तळ्याच्या
काठावरचा बगळा
आठवण करून देई
इसापचा गोष्टीची
कोल्ह्याची नि बगळ्याची.
त्या गोष्टीतली
इसापनीती ऐशी :
"शठंप्रति शाठ्यम्‌".
येशुवीनीती ऐशी :
"मारली कुणी थप्पड,
पुढे करा दुजा गाल
(असला जरी खप्पड)”.
येशू-इसाप ह्यांचा वाद
चालू आहे चिरंतन.

No comments:

Post a Comment