Sunday, June 26, 2011

(१५१) ती येते आणिक जाते................................भाजीवाली



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



ती येते आणिक जाते भाजीवाली



ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन्‌ जाताना फुले मागते
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे न कधी ती म्हणते

येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते ’नाही’, ’हो’, ही म्हणते

येतानाची कसली रीत:
गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते

कळ्याफुलांच्या मागे येते
कोमट सायंचेहरा घेते
उदी उदासी पानी भरते
"मी येऊ रे ?" ऐकू येते
मध्यरात्रभर तेच तेच प्रतिध्वनि ते

कवी : आरती प्रभू


ती येते आणिक जाते
विकण्यासाठी भाजी आणिते
विकते आणि पैसे घेते
येणे-जाणे, देणे-घेणे
होत असते जे न कधी ती चुकते

येताना कधि पान खाते
अन्‌ हसुनी दातां दाखवते
सौदा करुनी झाल्यावरती
मारते गप्पा काहीबाही,
लक्ष न देता काही वेळी होय-नाही म्हणते

येतानाची तिची अशी रीत:
गुणगुणते ती काही गीत,
जाताना पुन्हा फिरून तैसे;
सौम्य प्रसन्न आनंदाचे
वातावरण ती भरून जाते

अपुल्या बालका घेऊन येते
अधुनिमधुनि तया प्रेमे चुंबते
गप्पा करता तया पान्हा देते
स्तनपान करुनी मूल झोपी जाते
दिवसभर भाजी विकत कालक्रमणा करते


No comments:

Post a Comment