Sunday, June 26, 2011

(१५०) धुंदी कळ्यांना..................................संतप्त भावनांना



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



धुंदी कळ्यांना संतप्त भावनांना



धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना

तुझ्या जीवनी नीतिची जाग आली
माळरानी या प्रीतिची बाग आली
सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा

चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना

कवी : जगदीश खेबुडकर
चित्रपट:  धाकटी बहीण

संतप्त भावनांना, प्रक्षुब्ध भावनांना
शब्दरूप आले तुझ्या भावनांना

ज्वालामुखीसी अचानक जाग आली
की धरणीकंपास सुरवात झाली
पडला माझ्यापुढे हा उखाणा!

तुझे शब्द की थेंब हे जहराचे
तुझे शब्द की उच्छ्वास हे ड्रॅगनाचे
असे खास हा कलियुगाचा जमाना!

ज्येष्ठी चढे ताप विवस्वताचा
तसा वाढे अंगार तुझ्या लोचनांचा
पण झाले तरी काय सांग मला ना!


No comments:

Post a Comment