खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
दूर दूर चांदण्यात | एका ऋ्णकोची कैफियत |
---|---|
दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो तारकांस हालचाल मी तुझी विचारतो वाटते कधी चुकून भेटशील तू अजून थांबता पुन्हा मधून अन् उगीच सावल्यात स्वैरभैर पाहतो चाललो असेच गात ऐकते उदास रात चंद्रमा झुरे नभात अन् इथे फुलाफुलात मी तुलाच शोधतो वेड लागले जिवास हे तुझे दिशात भास हा तुझा मनी सुवास आपुल्याच आसवात मी वसंत ढाळतो कवी : सुरेश भट |
तुजपासून दूर दूर मी राहू इच्छितो लपूनछपून हालचाली मी करत राहतो वाटते भीती सदैव भेटशील तू चुकून चालता रस्त्यामधून मागेपुढे अन् उगीच स्वैरभैर पाहतो धुंडतो दैनिकात नोकरीची जाहिरात बायको झुरे घरात अन् कसेतरी दिवस मी पाठी घालतो वेड लागले की काय होई अधुनमधुन भास हा नियतीचा खेळ खास आशांकुर तरीही मनात मी जोपासतो |
No comments:
Post a Comment