Sunday, June 26, 2011

(१४८) तू तेव्हा तशी........................... तू केव्हा अशी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



तू तेव्हा तशी तू केव्हा अशी



तू तेव्हा तशी
तू तेव्हा अशी
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा,
तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने
तू काही दाणे
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी
तू कधी कुणी
खारीच्या ग डोळयांची

तू हिरवी कच्ची
तू पोक्त सच्ची
खट्टी मिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

कवी: आरती प्रभू
चित्रपट : निवडुंग


तू केव्हा अशी
तू केव्हा तशी
तू लहरी फारची

तू ऐल तीरा
मी पैल तीरा
नदी वाहते मधूनची

तू करशी बहाणे
घालशी उखाणे
तू अजब प्रश्नांची

तू नवीजुनी
काढशी उणी
भासशी घारीच्या डोळयांची

तू लवंगी मिरची
तू फटाकडी
हट्टी मनाची

तरीही मला तू
फसवू शकशी;
करणी ईश्वराची!



No comments:

Post a Comment