खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
त्रिधा राधा | त्रिधा त्रेधा |
---|---|
आभाळ निळे तो हरि, ती एक चांदणी राधा, बावरी, युगानुयुगीची मनबाधा विस्तीर्ण भुई गोविंद, क्षेत्र साळीचे राधा, संसिद्ध, युगानुयुगीची प्रियंवदा जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न, युगानुयुगीची चिरतंद्रा कवी : पु.शि. रेगे |
आभाळ फुटून पाऊसधारा चटकचांदणी राधा उघडे छत्री; सुसाट वारा ; छत्री झाली उलटी. विस्तीर्ण रस्ता कडेने चालता राधा घसरली भुईशी गाठ पृष्ठभागाची. जलाशयाच्या काठावर निश्चल कृष्ण, जवळून चालता राधा ढकले कृष्ण तिला पाण्यात . |
त्रिधा राधा | विषबाधा |
---|---|
आभाळ निळे तो हरि, ती एक चांदणी राधा, बावरी, युगानुयुगीची मनबाधा विस्तीर्ण भुई गोविंद, क्षेत्र साळीचे राधा, संसिद्ध, युगानुयुगीची प्रियंवदा जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न, युगानुयुगीची चिरतंद्रा कवी : पु.शि. रेगे |
आभाळ निळे त्रिप्रहरी चालत होती एकटी वृद्धा बिचारी, चावला सर्प, झाली विषबाधा विस्तीर्ण शेत हरित होती मधुन चालली वृद्धा संसिद्ध, योगायोगाची अप्रियकथा जलवाहिनी संथ काल पान सुकले, काठी पडले विप्रोषित युगानुयुगीची चिरनिद्रा |
त्रिधा राधा | त्रिधा शिधा |
---|---|
आभाळ निळे तो हरि, ती एक चांदणी राधा, बावरी, युगानुयुगीची मनबाधा विस्तीर्ण भुई गोविंद, क्षेत्र साळीचे राधा, संसिद्ध, युगानुयुगीची प्रियंवदा जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न, युगानुयुगीची चिरतंद्रा कवी : पु.शि. रेगे |
आभाळ निळे ते वरी झाडाखाली अवनीवरी बसला एक भुकेला युगानुयुगीची शरीरबाधा विस्तीर्ण भुई जनसंख्या अब्ज सात अर्ध्याहून अधिक भुकेली नव्या युगाची बाधा कालप्रवाह संथ उभा प्रश्न महान मिळणार का त्रिधा शिधा सगळ्यांना ; कसा |
No comments:
Post a Comment