Thursday, June 30, 2011

(१६६) जगण्यामध्ये ब्रह्मानंद...................दुर्गम काव्यरचनांमध्ये ब्रह्मानंद



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



जगण्यामध्ये ब्रह्मानंद दुर्गम काव्यरचनांमध्ये ब्रह्मानंद



बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.


सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रह्मानंद.

कवी : विंदा करंदीकर



शब्दकोशांच्या तुरुंगातून
मी शब्दांना मुक्त केले;
जिथे जिथे शक्य आहे
तिथे माझे काव्य गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

झरणीचे माझ्या हातात महायंत्र;
त्यातून जे काय बाहेर पडेल
त्या काव्याला असेल-नसेल ताळतंत्र.

शब्द जुळवून सगळ्यांसाठी
सुगम गीते लिहिण्यात मौज आहे;
शब्द जुळवून मुक्तछंदात
दुर्गम गीते लिहिण्यात ब्रह्मानंद.



No comments:

Post a Comment