खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
एक सवय | एक सवय |
---|---|
इसापनीतीतील ’इ’ गिरवायला घेतली तेव्हापासून जडलेली, अजूनही न सुटलेली ही सवय तात्पर्य काढण्याची. तात्पर्य आलेल्या कडूगोड अनुभवांचे. सुखदु:खाच्या प्रसंगांचे. चालण्याचे. बोलण्याचे. वागण्याचे. आपले. दुसऱ्याचे. सर्वांचे. तात्पर्य. वाटले होते या तात्पर्यांच्या दणकट खुंट्या रोवून सहज सहज चढावा हा संसारगड : हा बिकट उभा चढ श्रेयाकडे पोचणारा. पण कुठले काय? ही तात्पर्ये म्हणजे अगदी मऊसूत लवचिक. बसल्या बसल्या वळून लोंबत सोडलेल्या शेवयांसारखी. सुखासीन. आजपर्यंतच्या या तात्पर्यांच्या घनदाट झिरमिळ पडद्यामधे उभी असलेली मी. एकदा वाटते, कोण ही कैद! एकदा वाटते, किती मी सुरक्षित! कवयित्री : इंदिरा संत | इसाप नीतीतील ’इ’ गिरवायला घेतली तेव्हापासून जडलेली, अजूनही न सुटलेली ही सवय खोड्या काढण्याची. खोड्या बहीणभावंडांच्या. सवंगड्यांच्या. चालताना. बोलताना. वागताना. नवीननवीन. दुसर्यांच्या. सर्वांच्या. खोड्या. वाटले होते या खोड्यांच्या दणकट खुंट्या रोवून सहज सहज चढावा हा संसारगड : जरी त्याचा उभा चढ आकाशाकडे पोचणारा. पण सांगते काय? या खोड्या केल्या अगदी मऊसूत शेवयांसारख्या. बसल्या बसल्या रचलेल्या गंमतिकांसारख्या. मजेशीर. आजपर्यंतच्या या खोड्यांच्या चिकाच्या झिरमिळ पडद्यामधे उभी असलेली मी. एकदा वाटते मी आहे एक लहान मुलगी. एकदा वाटते, मी आहे गार्गी किंवा मैत्रेयी! |
No comments:
Post a Comment