खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
तात्पर्य | विचारवंत |
---|---|
द्यायचं नाही असं जरी ठरवलंस, तरी तू घ्यायचं नाहीस असा त्याचा अर्थ होतो म्हणून कुणी सांगितलं? अदृश्य हात दान देणार्या देवाचा झाडाला न कळत आतून आतून रसवतो आणि मग फांद्यांची फुलं होतात. सांगायचं तात्पर्य इतकंच की तू आधी नकळत फुलून घे; द्यायचं - घ्यायचं काय ते आपण नंतर पाहू. कवी : मंगेश पाडगांवकर | घ्यायचं नाही असं जरी मी ठरवलं तरी मी घेणार नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून कुणी सांगितलं? ठरवणं आणि त्याप्रमाणे माणसाने करणं न करणं ह्या दोन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत हे काय सांगायला पाहिजे? अर्थात् तसं मी कशाला ठरवणार? “जे मिळेल मोफत ते सूज्ञजन स्वीकारत” असे कोणी विचारवंताने (मी) म्हणून ठेवलेच आहे. |
तात्पर्य | वारुणी |
---|---|
द्यायचं नाही असं जरी ठरवलंस, तरी तू घ्यायचं नाहीस असा त्याचा अर्थ होतो म्हणून कुणी सांगितलं? अदृश्य हात दान देणार्या देवाचा झाडाला न कळत आतून आतून रसवतो आणि मग फांद्यांची फुलं होतात. सांगायचं तात्पर्य इतकंच की तू आधी नकळत फुलून घे; द्यायचं - घ्यायचं काय ते आपण नंतर पाहू. कवी : मंगेश पाडगांवकर | प्यायचं नाही असं जरी मी ठरवलं तरी मी "पिणार" नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून कुणी सांगितलं? अदृश्य हात पिणार्या माणसाचा पेला त्याच्या नकळत भरत रहातो आणि मग ते पेय त्याच्या पोटात जात रहाते सांगायचं तात्पर्य इतकंच की तू "पेया"पासून दूर रहाण्यात शहाणपणा आहे. . |
No comments:
Post a Comment