Tuesday, June 28, 2011

(१६३) बाधा जडली आभाळाला...................कवयित्रीची दुरवस्था



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



बाधा जडली आभाळाला कवयित्रीची दुरवस्था



बाधा जडली आभाळाला.
घुमू लागले
घुमवित घुमवित लाख घागरी;
बघू लागले वाकुन वाकुन
गवतावरच्या थेंबामध्ये;
फरफटलेही
उलटेसुलटे जळलहरींच्या मागुन;
टिपू लागले
ओठ लावुनी मातीचे कण.

आवरु बघते त्याला
दोन करांनी बांधुन,
आवरु बघते त्याला
डोळ्यांमध्ये कोंडुन.

व्यर्थच ते पण...
जाते निसटून
काजळावरी गढूळ ठेवुन छाया,
मुठीत ठेवुन फक्त निळी धग.

कवयित्री : इंदिरा संत


बाधा जडली ह्या कवयित्रीला
घुमू लागले
घुमवित घुमवित लाख घागरी;
बघू लागले वाकुन वाकुन
गवतावरच्या थेंबामध्ये;
फरफटलेही
उलटीसुलटी काव्यलहरींच्या मागुन;
टिपू लागले
ओठ लावुनी शब्दांचे कण.

आवरु बघते माझ्या स्फुरणाला
शब्दांच्या रज्जूंनी बांधुन,
आवरु बघते त्याला
तालामध्ये कोंडुन.

व्यर्थच ते पण...
गेले निसटून
स्फुरण, अन्‌ त्यामागून कवन,
हाती राही फक्त निराश झरणी.


No comments:

Post a Comment