Tuesday, June 28, 2011

(१६२) लाला कोणासाठी..........................पैशांच्या राशीसाठी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



लाला कोणासाठी पैशांच्या राशीसाठी



विश्वाशी मी वैर धरिले,
कान्हा कोणासाठी रे
दुनियेशी मी दावा धरिला,
लाला कोणासाठी रे

जहरी लहरी कालिया
भुलविल तुजला भूलभुलैय्या
नको साहसे करूस सैंय्या,
चिंध्यांच्या चेंडूसाठी

भावाशी भांडले
ताईशी तणतणले
वडिलांना वंचिले
पान्हा पाजणार्‍या आईशी मी झाले उफराटी

माझे बाई माहेर भरले
चांदीच्या घराला
सोन्याची कौले
राजकुमारी धावले मी गवळ्याच्या पोरासाठी

नको बिंदी मोतियाची
नको सरी सोनियाची
नको चमकी माणिकाची
दसलाखी तव हातांचा रे हार माझ्या कंठी

कवी : मनमोहन नातू


विश्वाशी तू वैर धरिले,
चाचा कोणासाठी रे
दुनियेशी तू दावा धरिला,
लाला कोणासाठी रे

जहरी लहरी कालिया
भुलविल तुजला भूलभुलैय्या
नको साहसे करूस सैंय्या,
चिंध्यांच्या चेंडूसाठी

गावाशी भांडलास
वेशीशी तणतणलास
गणगोतां वंचिलास
मदिरा पाजणार्‍या बाईशीही झालास उफराटी

तुझे भैय्या तळघर भरले
चांदीच्या थैल्यांनी
सोन्याच्या विटांनी
कमनशिब्या, धावलास तू पैशांच्या राशीपाठी

एक राशी मोतियांची
दुसरी राशी असे पाचूंची
तिसरी राशी माणिकांची
शतकोटी रुपयांचा असे रे गळफास तुझ्या कंठी


No comments:

Post a Comment