Thursday, June 30, 2011

(१६७) माझी प्रीत....................................आणि माझे गीत



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



माझी प्रीत आणि माझे गीत



सुकुमार माझी प्रीत
रानातल्या फुलवाणी;
नको पाहू तिच्याकडे
रागेजल्या नयनांनी.

लाजरी ही माझी प्रीत
लाजाळूच्या रोपाहुन;
नको पाहू वाट तिची :
तूच घेई ओळखून.

मुग्ध मूक प्रीत माझी :
निर्झराची झुळझुळ;
नको पाहू उलगून
अस्फुटसे तिचे बोल.

अल्ल्लडशी प्रीत माझी :
सर तिला पाखराची;
तुझ्या मनी आढळली
जागा तिला निवा-याची.

कवयित्री : इंदिरा संत


सुरेखसे माझे गीत
कानातल्या कुड्यांवाणी;
नको ऐकू ते रे तुझ्या
झाकल्या दोन्ही कानांनी.

झोपाळू हे माझे गीत
मरगळले पेंगून;
नको पाहू अंत त्याचा :
तूच घेई ते ओळखून.

नवे मूक आता गीत
सा्रे कसे शांत शांत
नको जाऊ गोंधळून :
“गेले कुठे हिचे बोल?”

अर्थापल्याडचे गीत माझे :
सर त्याला कवीश्रेष्ठांची;
माझ्या मनी आढळली
जागा त्याला निवा-याची.


No comments:

Post a Comment