खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!
तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.
निळा | आणि गुलाबी |
---|---|
एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा, दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा, मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा... असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे? ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे : जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा : होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग : निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग. कवी : बा. भ. बोरकर |
गुलाबी एका कोरांटीचा, गुलाबी एका गुलाबाचा, गुलाबी दूर डोंगरांआड सूर्य कलता, आकाशाचा, गुलाबी सफरचंदाच्या बाह्यांगाचा, गुलाबी रमणीच्या ओठांचा, लाल-गुलाबी रंग राजबिंड माणकांचा, सागराचा सूर्यास्ताचा सोनेरी-गुलाबी रंग, गुलाबी रंग तान्ह्या मुलाच्या त्वचेचा. असे रंग नाना गुलाबी किती कराव्या त्यांच्या अदबी! पण गालांपुढे तुझ्या गडे ते सगळे फिक्के! राहील पाहत हा तुझा लावण्यसोहळा कालिंदीच्या काठी कुणी जरा साधासिधा अन् बावळा. होऊ आपणही गुलाबी-लाल उधळूनिया गुलाल; होईल कुणी वारुणीपाने गाली गुलाबी हरीचा लाल! |
No comments:
Post a Comment