Sunday, July 3, 2011

(१६९) निळेसावळे...................................हवाबंद डबा



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवयित्रींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



निळेसावळे हवाबंद डबा



निळेसावळे आभाळ भरून ओथंबून
तसे माझे शब्द...घनगर्द
ओठांवर येता येता पांढरेभक्क झाले,
हलक्या हलक्या कवड्या झाले,
खुळखुळ वाजायला लागले,
पांढरेशुभ्र बगळे होऊन
ओठांवरून उडून गेले....
तेव्हा
मीच मनाचे ओठ घट्ट मिटून टाकले
क्षितिजासारखे.

कवयित्री: इंदिरा संत


काळेकुट्ट आभाळ होऊन, भरून
गडगडाट व्हावा तसे तुझे शब्द
तुझ्या ओठांवर येता गडगडले
काही बिजलीगत कडकडले
काही मुसळधार पावसागत कोसळले
काही उष्ण वाफेगत
ओठांवरून तुझ्या उडून गेले....
तेव्हा
मी माझे दोन्ही कान लगेच घट्ट झाकून टाकले
हवाबंद --आवाजबंद-- डब्यासारखे!


No comments:

Post a Comment