Sunday, July 3, 2011

(१७०) एक दिवस...................................दृष्टी तशी सृष्टी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



एक दिवस दृष्टी तशी सृष्टी



जीव लागत नाही माझा
असा एक दिवस येतो
कधी अधुनमधुन केव्हा
लागोपाठ भेट देतो
अशा दिवशी दुरावलेले
उजाड सारे आसपास
घर उदास बाग उदास
लता उदास फुले उदास
वाटते आयुष्य अवघे
चार दिवसांचेच झाले
कसे गेले कळले नाही
हाती फार थोडे आले
दोन दिवस आराधनेत
दोन प्रतीक्षेत गेले
अर्धे जीवन प्रयत्नात
अर्धे विवंचनेत गेले
आस हरपलेली असते
श्वास थकले वाटतात
अश्रू बाहेर गळत नाहीत
आत जळत राहतात.

कवी : अनिल


जीव आनंदित करून जातो माझा
असा एक दिवस येतो,
कधी अधुनमधुन केव्हा
लागोपाठ भेट देतो.
अशा दिवशी उजळतो
सगळीकडे सूर्यप्रकाश;
घर सुहास, बाग सुहास,
लता सुहास, फुले सुहास.
कधी वाटते आयुष्य
जरा चटकन्‌ निघून गेले;
संथ अर्थात्‌ काळाचा रथ
नित्यागत चाले.
दोन दिवस आराधनेत
दोन प्रतीक्षेत गेले -
हा जीवनक्रम आहे;
त्यात वृथा दुःख कसले?
आस संपलेली असते,
श्वास-उच्छ्वास चालत असतो.
वृथा अश्रू मी ढाळत नाही,
आत कापूर छान जळत रहातो.


No comments:

Post a Comment