Sunday, June 12, 2011

(५६) स्वप्नातल्या कळयांनो......................रम्य स्वप्नसृष्टी



खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!


तुमच्या कंप्युटरवर दोन्ही कवितांच्या ओळी सुसंगत रितींनी दिसल्या नाहीत तर तुमच्या keyboardवरची “Ctrl” आणि “- ” किंवा “Ctrl” आणि “+ ” ही दोन बटणे एकाच वेळी दाबून अक्षरांचा आकार –font size– पुरेसा लहान किंवा मोठा केला असता त्या सुसंगत रितींनी दिसतील. त्या सुसंगत रितींनी दिसणे बरेच इष्ट आहे.



स्वप्नातल्या कळयांनो रम्य स्वप्नसृष्टी


स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लाविल वेड जीवा

रेखाकृती सुखाच्या, चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरुन गेल्या
कधी सोशिला उन्हाळा कधी लाभला विसावा
स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजूनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती, केव्हा गुलाब यावा
स्वप्नातल्या कळयांनो, उमलू नकाच केव्हा

कवी : म. पा. भावे

छान रम्य स्वप्नांनो, संपू नकाच केव्हा
चारू सृष्टी तुमची देते मज गोड मेवा

चलच्चित्रे सुखाची चालू अखंड राहोत
खळखळत वाहणारे निर्झर निर्भर वाहोत
ह्या सृष्टीत नसे ग्रीष्म, न शिशिराचा गारवा
शरदृतू बारामास वाजवी मधुर पावा

"आनंदी आनंद गडे" गीत बालकवीचे
मूलगीत रंगिले ह्या स्वप्नसृष्टीचे
तिथे न काटे गुलाबा, खेद नसेही नावा
छान रम्य स्वप्नांनो, संपू नकाच केव्हा


No comments:

Post a Comment